आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी धमकी देणारा ‘गोत्यात’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 12, 2022
Spread the love

वाकड पोलिसांची कारवाई : १२ डिसेंबर २०२१ रोजी घडली होती घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रिलेशनशिपमध्ये रहा, नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पिंपळे निलख येथील युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार १२ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वाकड येथे घडला होता.

अभिजित मधुकर शिंगन (वय 28, रा. पिंपळे निलख) असे अटक केलेल्या आरोपी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा फिर्यादी यांच्याकडे रिलेशनशिपमध्ये रहा, म्हणून मागे लागला होता. यावरून फिर्यादी यांनी आरोपी विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पण, तरी देखील आरोपी फिर्यादी यांचा पाठलाग करीत होता. तसेच फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादी यांना शिवीगाळ आणि मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, याप्रकरणी एका महिलेने गुरूवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी युवकाला अटक करण्यात आले आहे.