आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महिलेवर ब्लेडने सपासप वार करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 14, 2022
Spread the love

फरासखाना पोलिसांत फिर्याद : वेश्यागमनाचे रेटवरुन भोई गल्लीत भर रस्त्यात घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वेश्यागमनाचे रेटवरुन झालेल्या भांडणात एकाने महिलेवर ब्लेडने वार करुन गंभीर जखमी करणाऱ्याला अटक केली. हा प्रकार बुधवार पेठेतील भोई गल्लीत शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता घडला.

राजाप्पा सिद्धलिंगप्पा (वय 40, रा. जुनी वडारवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 35 वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या वेश्या व्यवसायासाठी उभ्या असताना आरोपी तेथे आला. वेश्यागमनाचे रेटवरुन त्यांच्यात वाद झाला. त्यांनी आरोपीबरोबर जाण्यास नकार दिला. या कारणावरुन आरोपीने “तू माझ्याबरोबर वेश्यागमनासाठी येत नाही का?. मी तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देऊन त्यांच्याकडे असलेल्या दाढी करण्याचे ब्लेडने फिर्यादीच्या डाव्या छातीचे खालील बाजूला वार करुन फिर्यादीस गंभीर जखमी केले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन सिद्धलिंगप्पा याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.