आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

परदेशी बनावटीची मशीन चोरणाऱ्यास ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 14, 2022
Spread the love

स्वारगेट पोलिसांची कामगिरी : दोन लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गुलटेकडी डायस प्लॉट येथून परदेशी बनावटीची मशीन चोरणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून दोन लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

लक्ष्मण शंकर कोल्हे (वय २३, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, प्रशांत श्यामराव पाठक (वय ६७, रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी परदेशी बनावटीच्या मशीनची चोरी झाल्याची तक्रार स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना माहितीदारांकडून आरोपीविषयी माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक करून दोन लाख ७७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ए. के. रसाळ, येवले, कांबळे, साळवे, वाबळे, शेख, खेंदाड, बडे, भोकरे, ढावरे, दळवी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.