आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 14, 2022
Spread the love

स्वारगेट पोलिसांची कामगिरी : २७ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सराईत घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून २७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिसांनी सांगितले की, देवेंद्र कुमार ठक्कर (वय ५६, रा. गणेशधाम बिल्डिंग, धनकवडी, पुणे) यांनी गोडावूनचा कडीकोयंडा उचकटून २७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली, त्याच्याकडून २७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ए. के. रसाळ, पोलीस उपनिरीक्षक जगताप, महिला पोलीस उपनिरिक्षिका साबळे, पोलीस हवालदार गुरव, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे, पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.