आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

देहुगावात पत्नीनं साथीदारांच्या मदतीनं केली पतीची ‘गेम’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 14, 2022
Spread the love

देहूरोड पोलिसांत फिर्याद : दोन फरारी झालेल्यांचा पोलीस घेताहेत शोध

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केला. ही घटना देहूगाव (जि.पुणे) परिसरात घडली आहे. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी साथीदारांच्या मदतीने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. हा प्रकार 30 जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास घडला.

आकाश अशोक गोरखे असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार बळीराम चव्हाण यांनी शनिवारी (दि.12) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पत्नी ज्योती आकाश गोरखे (वय १९) साथीदार सोनी उमेश जेगरे (वय ३१), रवी धनू राठोड (वय २९ दोघे. रा. देहूरोड) या तिघांना अटक केली असून, अक्षय लोंढे (रा. जाधववाडी, चिखली), राम विजय महोतो (रा. पटणा, बिहार), साहिल (पूर्ण नाव माहित नाही) या फरारी झालेल्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्यात आकाश गोरखे हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिस आकाशचा शोध घेत असताना धक्कादायक माहिती समोर आली. आकाश हा बेपत्ता झाला नसून, त्याचा खून झाल्याची माहिती समोर आली. आकाशचा खून त्याची पत्नी आणि तिच्या इतर साथिदारांनी मिळून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली.

पती आकाश गोरखे हा आरोपी पत्नी ज्योती हिचा छळ करुन मारहाण करत होता. या कारणावरुन आरोपीं अक्षय, राम आणि साहील यांनी आकाशचा खून करण्याचा कट रचला. आरोपी अक्षय, रवी आणि साहिल यांनी 30 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता आकाश गोरखे याला देहूगाव कमान येथून अज्ञात ठिकाणी नेले. त्याठिकाणी आकाशला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी आकाशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील करीत आहेत.