आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बंद फ्लॅट फोडून पावणेपाच लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 15, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : ससाणेनगरमधील स्वप्नपूर्ती सोसायटीत घरफोडी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ससाणेनगरमध्ये फ्लॅट फोडून चार लाख ८५ हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये १० फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी तीन ते ११ फेब्रुवारी सकाळी १०च्या दरम्यान चोरट्यांनी घरफोडी केली.

अनिलकुमार बेंदालम (वय ४३, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा फ्लॅट कुलुप लावून बंद होता. अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील गॅलरीतून दरवाजाची कडीकोयंडा तोडून चारलाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख २० हजार रुपये असा एकूण चार लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे पुढील तपास करीत आहेत.