आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जुन्या भांडणाच्या वादातून कोयत्याने वार करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 15, 2022
Spread the love

वारजे पोलिसांत फिर्याद : दत्तनगर-वारजे येथे रविवारी साडेनऊच्या सुमारास घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जुन्या भांडणाच्या वादातून कोयत्याने वार करणाऱ्यास अटक केली असून, त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. दत्तनगर-वारजे येथे १३ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

गोपी ऊर्फ विजय परबती साष्टे (वय ४९, रा. दत्तनगर, वारजे, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सागर बराटे (वय ३८, रा. वारजेगाव, पुणे) यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी एकमेकांचे नातेवाईक आहेत. भाड्याने दिलेल्या जुन्या दुकानावरून दोघांमध्ये वाद होता. आरोपीने फिर्यादीच्या गळ्यावर कोयत्याचा वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथील वाहनाची तोडफोड करीत, मदतीला आलेल्या व्यक्तींवरही कोयता उगारून दहशत निर्माण केली. वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत पडवळे पुढील तपास करीत आहेत.