आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चारचाकीमधील तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 15, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी देवाची हद्दीत घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावर (उरुळी देवाची) मोटारसायकलवरील चौघांनी कारचालकाला कोयत्याच्या धाकाने लुटले. शनिवारी (दि. १२ फेब्रुवारी २०२२) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

अजिंक्य अजित वाघ (वय ३०, रा. श्रीकृष्ण अपार्टमेन्ट, गंगापुरी वाई, ता. वाई जि सातारा) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य वाघ शनिवारी (दि. १२ फेब्रुवारी) आई व भाऊ यांच्यासोबत हडपसरवरून वाईकडे कारमधून जात होते. त्यावेळी पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी देवाची हद्दीत दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी कार थांबविण्यास सांगून कारच्या काचेवर दगड मारले आणि दोघांनी जवळ येत शिवीगाळ करीत कोयत्याच्या धाकाने शर्टचे खिशातील ५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आईलाही शिवीगाळ करून करू लागले त्यावेळी अजिंक्य वाघ व त्यांचे भाऊ गाडीच्या बाहेर आले असता चोरट्यांनी पळ काढला. चोरटे २५ ते ३० वयोगटातील असून, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.