आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सासवड रस्त्यावर लुटणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 15, 2022
Spread the love

उरुळी देवाची पोलीस चौकी पोलिसांची कामगिरी : ४५ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावर उरुळी देवाची हद्दीमध्ये कारचालकाला लुटणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या. लोणी काळभोर पोलीस स्टेशनअंकित उरुळी देवाची पोलीस चौकीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिवेघाघाटात आरोपींकडून पाच हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

संतोष गौतम चव्हाण (वय २३), लक्ष्मण चंद्रकांत धारवडकर (वय २३), दीपक श्रीरंग सकट (वय १९), विकास कुसळे (सर्व रा. खंडोबाचा माळ, देवाची उरुळी, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.

पोलिसांनी सांगितले की, उरुळी देवाची चौकीचे पोलीस अधिकारी- कर्मचारी दिवेघाटात गस्त घालत होते. त्यावेळी दिवेघाटातील तिसऱ्या वळणावर दोन संशयित मोटारसायकलवर दिसले, त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळाले. त्यांचा पाठलाग करून चौघांना पकडले. आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून दोन दुचाकी आणि रोख पाच हजार रुपये असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशन करीत आहे.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार शंकर नेवसे, विनोद कांबळे, पोलीस नाईक सागर वणवे, पोलीस शिपाई हेमंत कामठे, अभिजित टिळेकर, मंगेश साळवे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.