आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास केले अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 15, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : आंबेगाव बुद्रुक येथे सापळा रचून घेतले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आंबेगाव बुद्रुक येथे सूत्रांच्या माहितीनुसार सापळा रचून आरोपीला ९ फेब्रुवारी २०२२ रोजी ताब्यात घेतले.

सनी सोमनाथ सिंह (रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार २ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल होती. त्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू असताना आरोपी आंबेगाव बुद्रुक येथे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला सापळा रचून अटक केली.

पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा, पोलीस नाईक सचिन पवार, पोलीस शिपाई गणेश काळे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.