आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सोशल मिडियावर व्हीडिओ व्हायरल करणारा अल्पवयीन ताब्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 16, 2022
Spread the love

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने कापला केक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वाढदिवसाचा केक कापून हातात कोयता घेऊन नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार (दि.14) लोहियानगर येथे करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना लोहियानगर भागातील पी. एम. सी. कॉलनी नं. 9 येथे वाढदिवसाचा केक कोयत्याने कापून डीजे लावून नाचण्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर टाकल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने लोहियानगर येथे पंचासमक्ष छापा टाकून एका विधिसंघर्षीत मुलाला ताब्यात घेऊन 500 रुपयांचा कोयता जप्त केला. अल्पवयीन मुलावर खडक पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या गुन्हेगार आणि तरुणांमध्ये मध्यरात्रीच्या वेळी चौकामध्ये गर्दी करुन वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार सुरु आहेत. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचे केक तलवार, कोयता यासारख्या हत्यारांचा वापर करुन कापले जात आहेत. तसेच त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, अय्याज दड्डीकर यांच्या पथकाने केली.