आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आईचा विनयभंग करणारा दिवटा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 16, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने केला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आईने पैसे देण्यास नकार दिल्याने २८ वर्षाच्या दिवट्याने (मुलगा) ५५ वर्षाच्या आईला खाली पाडून तिच्याबरोबर अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोंढव्यातील भीमनगरमध्ये ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी २८ वर्षाच्या मुलाला अटक केली आहे. याप्रकरणी एका ५५ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा फिर्यादी यांचा मुलगा आहे. त्याने फिर्यादी यांच्याकडे काही रक्कम मागितली होती. फिर्यादी याने ती न दिल्याने त्याने चिडून फिर्यादी यांनी परिधान केलेली साडी वर करुन त्यांना खाली पाडले. फिर्यादी यांचे पाय वर केले असता त्यांनी त्यास असे का करतो, असे विचारले. त्यावर त्याने फिर्यादीस गप्प रहा, असे म्हणून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीच्या या वर्तनामुळे त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याने त्यांनी विनयभंग केल्याची फिर्याद दिली असून कोंढवा पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.