आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खरेदीच्या आमिषाने पावणेतीन लाख रुपयांना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 16, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करून फसवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ओएलएक्स वरून एसी आणि बेड खरेदीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका डॉक्टर तरुणाला पावणेतीन लाख रुपयांचा गंडा घातला.

डॉ. वासव राठोड (वय २४, रा. नॅन्सी लेक होम, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, डॉ. राठोड यांनी घरातील जुना एसी आणि बेड विक्रीची जाहिरात ओएलएक्सवर अपलोड केली होती. जाहिरातीत डॉ. राठोड यांनी मोबाईल क्रमांक दिला होता. चोरट्यांनी डॉ. राठोड यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. एसी तसेच बेड खरेदीची बतावणी करून चोरट्यांनी त्यांना क्यूआर कोड पाठवून, तो कोड स्कॅन करण्यास डॉ. राठोड यांना सांगितले. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने पैसे खात्यात जमा करतो, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. क्यूआर कोडच्या आधारे चोरट्यांनी डॉ. राठोड यांच्या बँक खात्याची माहिती चोरली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने डॉ. राठोड यांच्या खात्यातून दोन लाख ७६ हजार रुपये लांबविले. बँक खात्यातून पैसे लांबविण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉ. राठोड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता यादव पुढील तपास करीत आहेत.