आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शासनाने घालून दिलेल्या निमयांचे पालन करा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 16, 2022
Spread the love

रामदास शेळके : शिवजयंतीनिमित्त बार्शी पोलीस स्टेशनमध्ये शिवभक्तांची बैठक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी : शिवजयंती उत्साहात साजरी केली पाहिजे. मात्र, त्यामध्ये कोणताही बिभत्सपणा नको आहे. शिवजयंतीनिमित्त ट्रिपल सीट, हॉर्नचा कर्कश्य आवाज करणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई केली जाईल. कोरोना व ओमिक्रोन संपला नाही, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, गर्दी करू नका, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन बार्शी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सर्व शिवभक्तांना केले.

बार्शी शहर पोलीस स्टेशन व बार्शीमधील शिवभक्तांची शिवजयंतीनिमित्त बैठक झाली. याप्रसंगी शहर पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, पोलीस उपनिरीक्षक कर्नेवाड आणि बार्शी शहरातील मंडळे आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. किरण गाढवे म्हणाले की, मागिल सात वर्षापासून बार्शी शहरामध्ये शिवजयंतीनिमित्त शिवभक्त दोन रांगेमध्ये बारा बलुतेदार पालखी खांद्यावर घेऊन प्रत्येक चौकातून परिक्रमा होते. येथे पालखीवर पुष्प वर्षाव केला जातो. यावेळी सर्व नागरिक दर्शन घेतात. तसेच, जय शिवराय प्रतिष्ठान अध्यक्ष विजय राऊत यांनी शिवजयंतीनिमित्त अनेक वेगवेगळे निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती दिली.