आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘गणेश पेठेचा भाई असल्याचे सांगत तडीपार गुन्हेगाराचा ‘राडा’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 17, 2022
Spread the love

भर रस्त्यात महिलेचा विनयभंग करुन पसरविली दहशत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलिसांच्या रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगाराने ‘मी गणेश पेठेचा भाई आहे, मला पोलिसांची भीती दाखवू नका नाही तर एकेएकाला कोयत्याने खल्लास करुन टाकील’, अशी धमकी देत भर रस्त्यात महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार गणेश पेठेतील सादडी सदनजवळ सोमवारी रात्री आठ वाजता घडला.

संदीप कमलाकर चव्हाण (वय ४२, रा. गणेश पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी एका ४६ वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्यांचे सासरे हे त्यांच्या दुकानाच्या ओट्यावर बसले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या सासर्‍यांनी पोलिसांकडे तक्रार केली, अशी समजूत करुन घेऊन संदीप चव्हाण याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी यांनी विचारले असताना त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याला समजाविण्यास फिर्यादी यांची चुलत सासू गेली असताना त्यांना कोयत्याने धमकाविले. कोयता हवेत फिरवून ‘मी गणेश पेठेचा भाई आहे. मला पोलिसांची भीती दाखवू नका, नाही तर एकएकाला कोयत्याने खल्लास करुन टाकीन’, असे मोठमोठ्याने ओरडून दहशत पसरविली. त्यामुळे आजू बाजूचे लोक व मुले पळून गेली.

संदीप चव्हाण याला परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्तांनी यापूर्वी तडीपार केले होते. सहायक पोलीस निरीक्षक शेटे अधिक तपास करीत आहेत.