आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 17, 2022
Spread the love

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलिसांच्या दिले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गोळीबार करून खून करण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने जेरबंद केले. आरोपीला पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

कुणाल रवी गायकवाड (वय २१, रा. धायरेश्वर मंदिर, शिवांजली मित्रमंडळाजवळ, धायरीगाव, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
बिबवेवाडी पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील फरार खडकवासला धरणाजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचून पकडले. त्याला गुन्हे शाखा-१ येथे आणून पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस अंमलदार सतीश भालेकर, दत्ता सोनावणे, राहुल मखरे, महेश बामगुडे, अशोक माने, शशिकांत दरेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.