आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कात्रजमध्ये जुगार-मटका क्लबवर छापा, १० अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 18, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : २५ हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कात्रज (दत्तनगर) येथे पत्र्याच्या शेडमध्ये जुगार-मटका बिनधास्त सुरू असलेल्या पत्याच्या क्लबवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी करून कारवाई करून दहाजणांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून २५ हजार रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.

कात्रज (दत्तनगर) येथील सर्व्हिस रोड, आनंद दरबार ट्रस्ट समोर कात्रज येथे पत्र्याचे शेडमध्ये बेकायदेशीर मटका जुगार धंदा सुरू असल्याची माहिती १६ फेब्रुवारी रोजी पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी सावधपवित्रा घेत छापा टाकला. यावेळी येथे कल्याण मटका जुगार व पंती पाकोळी सोरट जुगार खेळत असताना १० जण आढळून आले.

आरोपींना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात रोख रूपये २५ हजार आणि जुगाराचे साहित्य मिळुन आले. १० जणांविरूध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अमंलदार बाबा कर्पे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, प्रफुल्ल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.