आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जिल्ह्यातून तडीपार गुन्हेगाराला केली अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 19, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत केली कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलीस उपायुक्त यांच्या आदेशान्वये ऑगस्ट २०२१ पासून दोन वर्षांकरिता तडीपार केलेल्या गुन्हेगाराला लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली.

प्रणव भारत शिरसाठ (वय २१, रा. आंग्रेवस्ती, लोणी स्टेशन, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.
पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केलेला गुन्हेगार लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा पाठलाग करून १४२प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली.

अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, संभाजी देवीकर यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.