आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सदनिकाधारकांना बांधकाम व्यावसायिकाने फसविले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 21, 2022
Spread the love

देहूरोड पोलिसांत फिर्याद : ओम तिरुपती डेव्हलपर्सच्या चौघांवर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सदनिकाधारकांना नियमाप्रमाणे सुविधा न देता फसवणूक केल्याप्रकरणी ओम तिरुपती डेव्हलपर्सच्या चौघांवर देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मामुर्डी येथील मॅजिया अव्हेन्यु सोसायटी, साईनगर येथे घडला आहे.

ओम तिरुपती डेव्हलपर्सचे पार्टनर सागर ओमप्रकाश अग्रवाल, इराण्णा कृष्णाप्पा रायचुरकर, संतोष प्रभाकर तरस, ओमप्रकाश हरिचंद्र अग्रवाल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सिद्दीक इस्माइल शेख (वय-34 रा. मॅजिया अव्हेन्यु सोसायटी, साईनगर, मामुर्डी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादींनी ओम तिरुपती डेव्हलपर्स यांच्या मॅजिया अव्हेन्यु सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला आहे. आरोपी बिल्डर यांनी फिर्यादी यांना फ्लॅटचा ताबा देणे, वेळेत काम पुर्ण न करणे, नकाशे न देणे, हस्तांतर पुर्वीचे खर्च न भरणे, सोसायटी रजिस्ट्रेशन करुन देणे, करारनाम्यात लिहून दिलेल्या सुविधा न पुरवणे, पार्कींग सुविधा न देणे, विना संमती बांधकाम करणे अशा वेगवेगळ्या प्रकारे फिर्यादी यांची फसवणूक करुन त्यांचा विश्वासघात केला. तसेच आर्थिक नुकसान केल्याचे फिर्यादी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.