आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

२४ कॅरेटचे सोने देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला फसविले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 21, 2022
Spread the love

खडकी पोलिसांत फिर्याद : २८ डिसेंबर २०२१ ते १९ फेब्रुवारी २२ दरम्यान घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : २४ कॅरेट चोख सोने देण्याच्या आमिषाने खडकी बाजार येथील एका व्यावसायिकाची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २८ डिसेंबर २०२१ ते १९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी श्रीपाल निहालचंद शाह (वय ४६, रा. खडकी बाजार) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अवि संजय जैन (रा. कमल कुंज, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, श्रीपाल शाह यांचे खडकीमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यांनी आरोपीच्या एस पी गोल्ड अ‍ॅपवर २८ डिसेंबर रोजी १०० ग्रॅम चोख सोने ऑर्डर केली. ४७ हजार ९९० रुपये प्रति तोळा याप्रमाणे त्याचे ४ लाख ७९ हजार ९०० रुपये झाले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी आणखी १०० ग्रॅम चोख सोने ४७ हजार ६८० रुपये प्रति तोळा या भावाने ऑर्डर केली. त्याचे एकूण ९ लाख ८६ हजार ३९६ रुपये त्यांनी ३१ डिसेंबर २०२१ रोजी आरोपीच्या एस पी गोल्डच्या बँक खात्यात जमा केले. तरीही आरोपीने २०० ग्रॅम सोने न देता व खरेदीपोटी ऑनलाइन घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केली असल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कदम अधिक तपास करत आहेत.