आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शीत शिवजयंती उत्सव शांततेत साजरा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 21, 2022
Spread the love

पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या प्रयत्नांना यश : शिवजयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या प्रयत्नाने बार्शीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात मात्र शांततेत पार पडला आहे.

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि रामदास शेळके यांनी शहरातील सर्व मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोविड तसेच कायदा आणि सुव्यवस्था बाबतीत असलेले शासन निर्णयाची माहिती देत अंमलबजावणीसाठी सर्वांच्या सहकार्यांची अपेक्षा व्यक्त करत दोन वर्षातील कोविड आणि लॉकडाऊनच्या परिस्थिती लक्षात घेऊन मंडळाने रक्तदान, अन्नदान, वृक्ष लागवड असे विधायक उपक्रमांवर भर द्यावा असे आवाहन केले होते.

त्या अवाहनाला प्रतिसाद देत शहरात जयंती साजरी करणाऱ्या सुमारे बावन्न मंडळापैकी मध्यवर्ती पालखी सोहळा वगळता एकाही मंडळाने शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीची परवानगी सुध्दा मागितलेली नाही प्रत्येक मंडळाने विविध सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती साजरी केली आहे. त्यामुळे पोनि शेळके यांच्या प्रयत्नाला यश आले आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पाच पोलीस अधिकारी, पंचावन्न कर्मचारी, एक एसआरपीएफ प्लाटून, तीस होमगार्ड तैनात होते.