आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आम्ही इथले भाई आहे अशी धमकी देणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : कात्रजमधील भारतनगरला जाणाऱ्या रस्त्यावर घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आम्ही इथले भाई आहे, कोणी पुढं आल्यास सोडणार नाही, अशी धमकी देऊन मारहाण करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. कात्रजमधील भारतनगरला जाणाऱ्या रस्त्यावर १९ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

दयानंद भीमराव सीतापराव (वय ३०), सुमित भीमराव सितापराव (वय २३, दोघे रा. निंबाळकरवस्ती, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अभिजित दिघे (वय ३५, रा. भारतनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कात्रजमधील भारतनगरला जाणाऱ्या रस्त्यावर छोटा टेम्पो घेऊन मार्केट यार्डमधून घरी जात होते. त्यावेळी आरोपीने टेम्पोसमोर येऊन शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मदतीस आलेल्या नागरिकांना कोणबी पुढे येणार नाही, आम्ही इथले भाई आहे, आमचे कोणी वाकडं करू शकत नाय, कोणी पुढ आल्यास, त्याला पण जीवंत सोडणार नाही, खलास करील एक-एकाला अशा धमक्या देऊन दहशत निर्माण केली. फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केली. फिर्यादीच्या पत्नीने जाब विचारला तर तिलाही शिवीगाळ करून मारहाण करीत आम्हाला कोणीच काय करू शकत नाही, आम्ही भाई आहे, मी जेलमध्ये गेलो, तर परत सुटून आल्यावर तुझा, तुझ्या बायकोचा आणि पोरांचा मर्डर करील, अशी धमकी दिली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अविनाश ढमे पुढील तपास करीत आहेत.