आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटकाच्या गाडीवर हल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

दिघी पोलिसांत फिर्याद : मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोरांचे कृत्य कैद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटकाच्या गाडीच्या काचा फोडल्या. हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. संघटकाना धमकाविण्याच्या हेतूने हा हल्ला केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी अमित ऊर्फ साई प्रदीप वाघमारे (वय ३५, रा. शिवतीर्थ सोसायटी, मोशी प्राधिकरण) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची स्वीफ्ट कार (एमएच १४ – एच के २३३१) ही शिवरुद्र प्रॉपर्टीज या वाघमारे यांच्या मोशीमधील ज्योती सोसायटी येथील कार्यालयाबाहेर पार्क केली होती. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दोघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांनी गाडीच्या समोरील काच दगड मारुन फोडली व गाडीचे काचेचे नुकसान केले. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा अशी नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.