आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रॉपर्टीसाठी सुनेकडून सासर्‍याला बेदम मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

चंदननगर पोलिसांत फिर्याद : चंदननगरमध्ये मालमत्तेच्या वादातून घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मालमत्तेच्या वादातून अनेक घरात वादावादी, भांडणे सुरु असल्याचे दिसून येते. मात्र, चंदननगरमध्ये एका ३२ वर्षाच्या सुनेने प्रॉपर्टीच्या वादातून आपल्या ७५ वर्षांच्या सासर्‍याला फरशी पुसण्याच्या पोच्याच्या दांडीने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी सकाळी ८ वाजता घडला.

याप्रकरणी चंदननगरमधील ७५ वर्षाच्या वृद्ध नागरिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी सून (वय ३२, रा. चंदननगर) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला ही फिर्यादी यांची सून आहे. फिर्यादी यांची पत्नी नातवंडांना दुध गरम करत असताना सुनेने फरशी पुसण्याच्या पोच्याच्या नळीने फिर्यादी यांच्या पाठीवर व हाताच्या तळव्यावर मारुन जखमी केले. तसेच, हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. तुम्ही मला प्रॉपर्टी कशी देत नाही, तेच बघते अशी धमकी दिली. सूनेच्या धमकीमुळे घाबरुन गेलेल्या वृद्ध आजोबांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कुमरे अधिक तपास करीत आहेत.