आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गोडावूनमध्ये काम करणाऱ्यास मारहाण करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

चंदननगर पोलिसांत फिर्याद : महापालिकेच्या खराडीतील गोडावूनमध्ये घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : खराडीतील महापालिकेच्या गोडावूनमध्ये नोकरीस असलेल्या दोघांना रॉड व दगडाने मारहाण करणाऱ्यास चंदननगर पोलिसांनी अटक केली. खराडीमधील स.नं.२० मध्ये १९ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.

कैलास धोंडिबा भगत (वय ३२, रा. यशवंतनगर, खराडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव असून, इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुरेश लष्करे यांनी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी स्वप्नील कोंढरे याच्यासह स.नं.४० खराडी येथील महापालिकेच्या गोडावूनच्या गेटवर नोकरी करीत होते. त्यावेळी आरोपीने रॉड व दगडाने मारून गंभीर जखमी करून सरकारी कामात अडथळा आणला. चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे पुढील तपास करीत आहेत.