आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रस्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन चोरणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद – बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया गेटजवळ घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कवडेवाडीचा रस्ता विचारण्याचा बहाणा करत गळ्यातील एक लाख दहा हजार रुपयांची सोन्याची चेन चोरून नेणाऱ्या चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया गेटवळ १९ फेब्रुवारी २०२२ रोजी ही घटना घडली.

चंद्रकांत तापकीर (वय ६६, रा. कल्याणीनगर, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कोरेगाव पार्क जंक्शन रोड येथून कारमधून जात होते. त्यांना थकवा आल्याने बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या गेटजवळ कार रस्त्याच्या बाजूला लावून आराम करीत होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी कवडेवाडी येथे कसे जायचे विचारले, त्यांना माहिती देण्यासाठी कारच्या बाहेर आल्यानंतर अज्ञातांनी एक लाख दहा हजार रुपयांची सोन्याची चेन चोरून नेली. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे धीरज कांबळे पुढील तपास करीत आहेत.