आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तिघा सराईत गुंडांसह 6 जणांच्या टोळक्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

येरवडा पोलिसांची कारवाई : वडगावशेरीतील ‘वॉटर बे’च्या मागील मैदानात तरुणावर कोयत्याने वार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भावाला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा सराईत गुंडांसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडगावशेरी येथील वॉटर बे सोसायटीच्या मागील मैदानात रविवारी रात्री सव्वादहा वाजता घडली.

आदिल सय्यद (वय २२), संकेत थेऊरकर (वय १८), आतिश डिंगरे (वय २०), रोहित धाडवे (वय १८), अजय साळवे (वय २०), आदित्य कांबळे (वय २०, सर्व रा. वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. आदिल सय्यद, आतिश डिंगरे आणि रोहित धाडवे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याप्रकरणी सईद जाकीर शेख (वय २५, रा. वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व संकेत थेऊरकर याच्याबरोबर वाद झाला होता. त्यावेळी शेख यांनी त्याला शिवीगाळ केली होती. शेख हे मोटारसायकलवरुन घरी जात असताना टोळक्याने त्यांना अडविले. आदिल सय्यद याने काल तू संकेत यास शिवीगाळ केली तो माझा भाऊ आहे, तुला बघुन घेतो, असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ केली. इतर आरोपींनी फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता नाकावर, कपाळावर मारुन गंभीर जखमी केले. जाताना कोयते हवेत फिरवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक करपे अधिक तपास करीत आहेत.