आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

इंस्टाग्राम फेक अकाऊंटवर अश्लील मेसेज पाठविणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

अलंकार पोलिसांची कारवाई : कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाचे अघोरी कृत्य

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरुणीच्या नातेवाईकांना तिच्याच नावाच्या बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरून आक्षेपार्ह मेसेज पाठविणाऱ्याला अलंकार पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या.


सायबर पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर तिच्याच कंपनीत काम करणार्‍या कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने हे कृत्य करीत असल्याचे आढळून आले.

जयमीन रितेश चावडा (वय २३, रा. बेलकेनगर, कोथरुड) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी एका कंपनीत काम करत आहे. तिच्या कंपनीत काम करणारा जयमीन चावडा याने इंस्टाग्रामवर फिर्यादीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले. लैंगिक उद्देशाने फिर्यादीचा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठलाग करुन तिची बदनामी होईल, अशा प्रकारचे अश्लिल व आक्षेपार्ह मेसेज फिर्यादीच्या नातेवाईकांना पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला.

हा प्रकार ९ व १० फेब्रुवारी रोजी घडला होता. फिर्यादीला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्याचा तपास केल्यावर हा सर्व प्रकार त्यांच्याच कंपनीत काम करीत असलेला जयमीन चावडा करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.