आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सासवड रस्त्यावर वडकीनाला येथे झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वडकीनाला येथे भरधाव पिकअपची जोरदार धडक बसल्याने मोटारसायकलचालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सासवड रस्त्यावर वडकीनाला येथे २० फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर पिकअपचालक पळून गेला.

कृष्णा महादेव बिडगर (वय २०, रा. वलवावस्ती, वडकी, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी योगेश मोडक (वय २९, रा. वलवावस्ती, वडकी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात पिकअपचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, हडपसर-सासवड रस्त्यावर वडकीनाला (ता. हवेली) येथे मोटारसायकलवरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव महिंद्रा पिकअपची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअपचालक पळून गेला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पी. के. हंबीर पुढील तपास करीत आहेत.