आवृत्ती पुणे
← Back to Homepage

युवकांमधील उर्जेचा वापर सकारात्मकतेने व्हावा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 23, 2022
Spread the love

अमित वर्दे व पंकज पिपाडा : पोलीस उपायुक्त परिमंडल-१च्या वतीने विधिसंघर्षित बालक मेळावा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पंधरा ते वीस वयोगटातील युवकांकडे मोठी ऊर्जा असते. या ऊर्जेचा वापर सकारात्मक दृष्टीने वापरला गेला पाहिजे, यासाठी पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज आहे, असे मत कोरेगाव पार्क येथील लाइफ स्कूल फाउंडेशनचे अमित वर्दे व पंकज पिपाडा यांनी व्यक्त केले.

पोलीस उपायुक्त परिमंडल-१ पुणे शहर यांच्याकडून विधिसंघर्षित बालकांसाठी विशेष समुपदेशन मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीष गोवेकर, सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, यांच्यासह ५० विधिसंघर्षित बालक आणि ५० पालक उपस्थित होते.

पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे म्हणाल्या की, विधिसंघर्षित बालकांच्या समुपदेशनासाठी पुणे शहर दलाकडून भरोसा सेल, प्रत्येक पोलीस स्टेशनकडील बाल कल्याण अधिकारी, स्वयंसेवी संस्था काम करीत आहेत. बालक आणि पालकांना आवश्यक ती मदत पोलीस दलाकडून केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.