आवृत्ती पुणे
← Back to Homepage

११ महिने पोलिसांना हुलकावणी देणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 23, 2022
Spread the love

समर्थ पोलिसांची कारवाई : झोमॅटो डिलेव्हरी बॉय’ आणि दूधवाल्याच्या भूमिकेतून केली कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलिसांनी झोमॅटो डिलेव्हरी बॉय आणि दूधवाल्याच्या भूमिकेतून तपास करत मोक्कातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेरांना समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

शुभम दिपक पवळे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, दत्तवाडीपुणे), आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे (वय २२, रा. डुल्या मारुती जवळ, गणेश पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

समर्थ पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्ह्यात सराईतांवर मोक्काअंतर्गत कारवाई करीत पाच आरोपींना अटक केली. मात्र, त्यांचे दोन साथीदार फरार होते. त्या दोघांना अटक करण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकाची चार पथके तयार करण्यात आली होती. आरोपींची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी वेषांतरही केले. तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जेरे व पोलीस अंमलदार यांनी कधी झोमॅटो डिलेव्हरी बॉय, कधी दुधवाला तर कधी गॅरेज मेकॅनिक बनून आरोपींची माहिती काढत होते. आरोपींची तांत्रिक माहिती गोळा करुन अंमलदारांच्या चार पथकाने सकाळी पाच वाजल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना मोक्का न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१च्या डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, सतिश भालेराव, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, श्याम सुर्यवंशी, शुभम देसाई, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, शरद वाकसे, संतोष थोरात, सुनिल हासबे, महिला पोलीस शिपाई छाया देवकर यांनी केली.