आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोन्याची अंगठी चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 23, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : फोन-पेद्वारे पेमेंट केल्याचे दाखवून केली फसवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : खरेदीच्या बहाण्याने फोन-पेद्वारे पेमेंट केल्याचे भासवून २९ हजार ५०० रुपयांची सोन्याची अंगठी चोरून नेली. अज्ञात चोरट्यावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हडपसरमधील यशदीप शॉपिंग सेंटरमध्ये सोन्या-चांदीच्या दुकानात २४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता चोरीची घटना घडली.

रामेश्वर (वय ४१, रा. साडेसतरानळी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार सोन्याची अंगठी चोरणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे हडपसरमधील पुणे-सोलापूर रोड येथे यशदीप शॉपिंग सेंटरमध्ये सोन्या-चांदीचे ज्वेलर्सचे दुकान आहे. आरोपी सोन्याची अंगठी खरेदी करण्यासाठी दुकानात आले आणि २९ हजार ९०० रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठीचे ऑनलाइन फोन-पे द्वारे पेमेंट केल्याचे भासविले. मात्र, पैसे न देता सोन्याची अंगठी घेऊन फसवणूक केली. हडपसर पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी पुढील तपास करीत आहेत.