आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दगडफेक करणाऱ्यावर पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 23, 2022
Spread the love

मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : चाफळकर कॉलनीत भल्या पहाटे घडला थरार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडी करणाऱ्या तीन-चार चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर चोरट्यांनी दगडफेक केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. पुणे–सातारा रोडवरील चाफळकर कॉलनीत पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, सातारा रोडवरील सिटी प्राईडमागे चाफळकर कॉलनीतील सानिया या अपार्टमेंटमध्ये चोरटे घरफोडी करण्यासाठी शिरले होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तिसर्‍या मजल्यावर आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकाला जाग आल्याने त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. पहाटे गस्तीवर असलेले बीट मार्शल तातडीने तेथे दाखल झाले. यावेळी चोरटे इमारतीतून बाहेर येत होते. पोलिसांना पाहून चोरट्यांनी चाकू त्यांच्या दिशेने फेकून मारला. पाठोपाठ तेथील दगड उचलून ते पोलिसांना मारु लागले. हे पाहून बीट मार्शल यांनी हवेत गोळीबार केला. तेव्हा चोरटे शेजारील ओढ्यातून पळून गेले.

या घटनेची माहिती मिळाल्यावर आणखी पोलीस कुमक तेथे पाठविण्यात आले. चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असून मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.