आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘मटका किंग’ खूनप्रकरणी पुण्यातील भाजपचा ‘गोल्डन मॅन’ अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 24, 2022
Spread the love

शिरवळ पोलिसांनी पुण्यात केली कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील मटका किंग संजय पाटोळे याच्या खून प्रकरणी पुण्यातील भाजप पदाधिकारी व गोल्डन मॅनला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. भारती विद्यापीठ परिसरात अमोल हुलावळे हा गोल्डन मॅन म्हणून ओळखला जातो.

अमोल बंडोपंत हुलावळे (वय ३६, रा. कात्रज) असे या गोल्डन मॅनचे नाव आहे. अमोल हुलावळे याच्याविरोधात यापूर्वी फरासखाना, हिंजवडी, दत्तवाडी पोलीस ठाण्यात मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.

फरासखाना पोलिसांनी त्याला बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. तसेच, वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शंकरा फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने राजकीय, सामाजिक कामाला सुरुवात केली. अखिल भारतीय मराठा महासंघाचा युवक प्रदेश उपाध्यक्षपदी त्याची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियनचा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आहे.

मटका किंग संजय पाटोळे याच्या खून प्रकरणी शिरवळ पोलिसांनी यापूर्वी ६ जणांना अटक केली होती. पैशांच्या देवाण घेवाणीवरुन त्याचा खून करण्यात आला होता. तरबेज मेहमूद सुतार, किरण बबनराव साळुंखे, विकी राजेंद्र जाधव, शंकर ऊर्फ तात्या आश्रुबा पारवे, नितीश ऊर्फ रित्या सतीश पतंगे आणि राकेश सुरेश गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत अमोल हुलावळे याचा हात असल्याचे समोर आल्यानंतर शिरवळ पोलिसांनी मंगळवारी त्याला पुण्यातून अटक केली. अमोल हुलावळे हा येणार्‍या महापालिका निवडणुक लढविण्याची तयारी करत होता. त्यादृष्टीने तो कात्रज परिसरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करु लागला होता.