आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत संकेत गायकवाड पुणे जिल्ह्यातून तडीपार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 24, 2022
Spread the love

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांचा आदेश : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा कारवाईचा बडगा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, तडीपार अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. आरोपीच्या तडीपारीचे आदेश पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिले आहेत.

संकेत सुनिल गायकवाड (वय २५, रा. कवडपाट टोल नाका, कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर) असे तडीपार करण्यात आलेल्या लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

आरोपी संकेत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने लोणी काळभोर, कदमवाक वस्ती, लोणी स्टेशन परिसरात दहशत निर्माण करुन गुन्हे केले आहेत. तसेच आरोपीने लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिक त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी आरोपी संकेत गायकवाड याचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता. प्रस्तावाची पडताळणी करुन आरोपी संकेत गायकवाड याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे, पोलीस अंमलदार गणेश सातपुते, संदिप धनवटे, मल्हारी ढमढेरे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.