आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोक्कातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 25, 2022
Spread the love

गुन्हे शाखा युनिट-४ची कारवाई : स्वारगेट येथील कालव्यावरील रस्त्यावर पकडले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मोक्कातील फरार आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-४ने मुसक्या आवळल्या. स्वारगेट येथील कालव्यावरील रस्त्यावर सापळा रचून आरोपीला अटक केली.

शंभू ऊर्फ राम बालाजी कावळे (रा. सुधाकर निवास, साठेवस्ती, लोहगाव, पुणे, मूळ रा. कावळेवाडी, ता. जि. उस्मानाबाद, जि.सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, मोक्कातील फरार आरोपी स्वारगेट परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कालव्यावरील रस्त्यावर ताब्यात घेऊन अटक केली. ओळखपत्र आणि विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये खात्री करून पुढील कार्यवाहीसाठी सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४चे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, सहायक पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस हवालदार राजस शेख, पोलीस नाईक संजय आढारी, पोलीस नाईक स्वप्नील कांबळे, प्रवीण भालचीम, पोलीस अंमलदार रमेश राठोड, वैशाली माकडी, चालक पोलीस हवालदार शीतल शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.