आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ऑनलाइन फोन पे ॲपद्वारे सोनारांची फसवणूक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 25, 2022
Spread the love

सोनारांची पोलिसांत फिर्याद : चंदननगर, वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरातील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अलीकडे चोरट्यांकडून चोरीचे नवे फंडे वापरले जात असल्याचे उघडकीस आले आहे. ऑनलाइन पे ॲपद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्यांनी ऑनलाइन फोन पे ॲपद्वारे पेमेंट केल्याचे भासवून तीन वेगवेगळ्या ठिकाणी एक लाख सहा हजार रुपयांना तीन सोन्याच्या दुकानदारांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला.

वानवडीतील इकु ज्वेलर्समध्ये सोन्याची अंगठी खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने सोन्याची अंगठी घेतली. ऑनलाइन फोन पे ॲपद्वारे २८ हजार ७०० रुपये पे केल्याचे भासवून सोन्याच्या अंगठीचा अपहार करून पसार झाला. ही घटना ६ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वानवडी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी पुढील तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत वडगावशेरीमधील श्री सावलिया ज्वेलर्समध्ये एक व्यक्ती सोन्याच्या दोन अंगठी खरेदीसाठी आली. त्याने ५२ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या खरेदी करून ऑनलाइन बिलाची रक्मक सेंड केल्याचा बनावट मेसेज दाखवून फसवणूक केली. वडगावशेरीतील श्री सावलिया ज्वेलर्समध्ये १२ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये भैरूलाल कुमावत (वय २१, रा. वडगावशेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

तिसरी घटना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेगाव पठार येथील नेहा ज्वेलर्समध्ये घडली. सोन्याच्या दुकानामध्ये अंगठी खरेदीच्या निमित्ताने एक व्यक्ती आली. त्याने २५ हजार ५०० रुपयेची अंगठी खरेदी करून बिलाची रक्कम ऑनलाइन फोन पे ॲपद्वारे पेमेंट केल्याचे फिर्यादीला भासविले आणि अंगठी घेऊन पसार झाली. याप्रकरणी मेहबूब सय्यद (वय ५५, रा. आंबेगाव पठार, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे पुढील तपास करीत आहेत.