आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 25, 2022
Spread the love

सिंहगड पोलिसांत फिर्याद : मुंबई-बंगलोर महामार्गावर नऱ्हे येथील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला. मुंबई-बंगलोर महामार्गावर नऱ्हे येथे २४ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली.

सदाशिव चनबा सैय्या रायचूरकर (वय ५०, रा. बाणेर, बालेवाडी) व प्रियंका मोहन सुखदेवे (वय २९, रा. ताथवडे, पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

संतोष वसंत बागडी (वय ३९, रा. मु.पो. कुमठे, ता. जि.सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अनिल हिंगणे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, मुंबई-बंगलोर महामार्गावर मोटारसायकलवरून सातारच्या दिशेने नऱ्हे येथून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव ट्रकची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पी. बी. कणसे पुढील तपास करीत आहेत.