आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तडीपार आदेशाचा भंग करणाऱ्यास केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 27, 2022
Spread the love

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : आरोपीला खडक पोलिसांच्या दिले ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट-१ ने जेरबंद केले. अटक आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त यांनी डिसेंबर २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आरोपीवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसिम उर्फ वच्छी गुलाम मोहम्मद शेख (वय ३२, रा. डीपी, लोहियानगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी, कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत होते त्यावेळी तडीपार आरोपी वसिम उर्फ वच्छी शेख हा चुडामण तालीम चौकातील मदिना हॉटेल येथे जेवण करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीवर खडक पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, दत्ता सोनावणे, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.