आवृत्ती पुणे
← Back to Homepage

किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 27, 2022
Spread the love

खडक पोलिसांत फिर्याद : गंज पेठेतील पीएमसी कॉलनीमध्ये घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करणाऱ्यास खडक पोलिसांनी अटक केली. गंज पेठेतील पीएमपी कॉलनीमध्ये २५ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

शैलेश विजय कसबे (वय २९, रा. ५४, पीएमसी कॉलनी, गंजपेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ आष्टुळ (वय २३, रा. लोहियानगर, पुणे) यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी गंज पेठ येथील पीएमपी कॉलनीमधील सार्वजनिक ठिकाणी देवीचा कार्यक्रम पाहत होते. त्यावेळी आरोपीने पायावर पाय पडल्याने झालेल्या किरकोळ वादातून शिवीगाळ करीत धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. खडक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.

get_footer();