आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कुऱ्हाडीने प्राणघातक वार करणाणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 27, 2022
Spread the love

विमानतळ पोलिसांत फिर्याद : विमाननगरमधील इंटरविडा शाळेजवळ घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तु कोणत्या मुलीला फोन करीत होता, असे म्हणत कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. विमाननगरमधील इंटरविडा शाळेजवळील चौकात २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

राहुल धुमाळ (वय २२, रा. विमाननगर, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी-आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादीला विमाननगरमधील इंटरविडा शाळेजवळील चौकात बोलावले. तू काल कोणत्या मुलीला फोन करत होता, असे म्हणून कुऱ्हाडीने हातातील अंगठ्यावर वार करून, तुला जीवंत सोडणार नाही, असे म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप पुढील तपास करीत आहेत.

get_footer();