आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मेगा सेंटरच्या पार्किंगमध्ये रिव्हॉल्व्हरच्या धाकाने लुटणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 28, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : लाथाबुक्क्यांनी आणि हॉकी स्टीकने केली मारहाण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मद्यपिंनी रिव्हॉल्व्हरची धमकी देत कारच्या काचा फोडून रोख पन्नास हजार रुपयांची बॅग चोरून नेली. मगरपट्टा येथील मेगा सेंटरच्या पार्किंगमध्ये २५ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

इजाज पठाण (वय ३४, रा. सातववाडी-हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कार्यालयीन कामकाज संपवून मगरपट्टा येथील मेगा सेंटरमधून घरी जाण्यासाठी पार्किंगमध्ये आले. त्यावेळी कारसमोर अज्ञात आरोपी दारू पित बसले होते. फिर्यादीने आरोपीला सांगितले बाजूला बसा मला घरी जायचे आहे असे सांगितले. त्यावर आरोपीने चिडून अंगावर धावून येत शिवीगाळ करून कारच्या चारही बाजूच्या काचा फोडून ५० हजार रुपये ठेवलेली बॅग चोरून नेली. लाथाबुक्क्यांनी आणि बेसबॉलच्या स्टीकने मारहाण करून रिव्हॉल्व्हरची धमकी दिली. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास करीत आहेत.