आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 28, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : मांजरी बुद्रुक येथील अनाजीवस्तीमध्ये घडला होता प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक केली. मांजरी बुद्रुक येथील अनाजीवस्ती येथे १९ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

लक्ष्मी किशोर परमार (वय २१, रा. अनाजीवस्ती, मांजरी बु।।, पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
किशोर देवारामजी परमार (वय २४, रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चेनाराम बोराना (वय ४२, रा. अनाजीवस्ती, मांजरी बुद्रुक, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली असता, लक्ष्मी किशोर परमार (वय २१, रा. अनाजीवस्ती, मांजरी बुद्रुक, पुणे) हिचे १२ डिसेंबर २०२१ रोजी किशोर परमार याच्याबरोबर लग्न झाले होते. सासरी नांदत असताना माहेरहून बिझनेससाठी पाच लाख रुपये आणावेत, यासाठी टोचून बोलणे, शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात उघड झाले. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गाडेकर पुढील तपास करीत आहेत.

get_footer();