आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गोळी झाडून घेणाऱ्या जेल पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 28, 2022
Spread the love

येरवडा कारागृहातील घटना : कौटुंबिक कारणावरून घटना घडल्याची शक्यता

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : येरवडा कारागृहात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या माने यांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान माने यांचा मृत्यू झाला.

अमोल मुरलीधर माने (वय-28) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, अमोल माने हे येरवडा कारागृहात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांना शनिवारी गार्ड ड्यूटी होती. पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सरकारी रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. हा प्रकरार समजताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. माने यांनी कौटुंबिक कारणावरुन हे कृत्य केल्याचे समजतेय. माने यांनी कपाळाच्या मध्यभागी गोळी झाडून घेतली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल माने हे मुळचे अहमदनगरमधील राहणारे असून ते 2015 मध्ये कारागृह पोलीस म्हणून भरती झाले होते.