आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला कोटींचा गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 28, 2022
Spread the love

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये रवि कानकाटे व स्वप्नील कानकाटेविरूध्द गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : उद्योजक महिलेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्याचा दुप्पट परतावा करून देतो असे आमिष दाखवून तब्बल एक कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ममता सिंह मलिक (वय 38, सध्या रा. अमरवस्ती, कोरेगाव. मुळ, ऊरूळी कांचन, मुळगाव अमरोहा, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेशयांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रवि कानकाटे ऊर्फ रविंद्र मुरलीधर भोसले ऊर्फ जगदीश मुरलीधर भोसले व स्वप्नील कानकाटे (दोघे रा. इनामदार वस्ती, गुरुदत्त नर्सरी शेजारी कोरेगाव ता. हवेली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, ममता सिंह मलिक यांनी मार्च 2021 पासून प्यूरिस्टिक न्युट्रिशियन नावाने उरुळी कांचन येथे सेंद्रिय उत्पादन व विक्रीचा व्यवसाय चालू केला आहे. त्यांच्या ओळखीचे राजेंद्र खेडेकर (रा. इनामदारवस्ती, उरूळी कांचन) यांच्या इनामदार वस्ती येथील पंचकृषी नर्सरी ठिकाणी ममता सिंग यांनी ऑफिस सुरु केले होते. त्याठिकाणी काम करत असताना रवि व स्वप्नील कानकाटे यांनी आयुर्वेदिक न्यूट्रीशियन बाबत चौकशी करून काही उत्पादने खरेदी करुन घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये येणे जाणे सुरु झाले होते. त्यादरम्यान त्यांनी शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याबाबतचा सल्ला दिला व गुंतवणुक केलेल्या रक्कमेच्या डबल रक्कम मिळेल असे सांगितले. त्यावेळी स्वप्नील याने रवि हा माझा भाऊ असून त्यास तुम्ही पैसे द्या त्याची जबाबदारी मी घेतो. अशा प्रकारे दोघांनी विश्वास संपादन केला.

त्यावेळी ममता सिंग यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून रवि कानकाटे यांच्या बँक खात्यामध्ये वेळोवेळी 25 जुलै ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत धनादेश, ऑनलाईन ट्रान्सफर, गुगल पे, एनईएफटी, आरटीजीएस द्वारे बँक खात्यावर व रोख स्वरुपात असे एकूण 1 कोटी रुपये दिले होते.
सुरूवातीला एक महिन्यानंतर रवी कानकाटे याने त्यांना काही रक्कम परतावा म्हणून दिली होती. त्यानंतर त्यांचे गुंतवणुकीवरील परतावा म्हणुन दोन कोटी पन्नास लाख रूपयाचा एचडीएफसी बँकेचा रवि भोसले या नावाचा धनादेश दिला. तो बँकेत भरला परंतू ते खाते बंद असल्याचे त्यांना बँकेकडुन समजले. तेव्हा त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाली. म्हणून त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.