आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लिक्वीड पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 1, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत पतीसह तिघांवर गुन्हा : कोंढव्यातील खळबळजनक घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेला फरशी पुसण्याचे लिक्वीड पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हांडेवाडी रोडवरील किंगस्टन सिरीन या सोसायटीत १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला होता.

याप्रकरणी हडपसर- सय्यदनगर येथे राहणार्‍या एका २३ वर्षाच्या विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी पती रेहान काझी, सासू नजमा काझी, नंणद गजाला काझी व हिना शेख यांच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पती, सासू, नंणदसह हांडेवाडी येथे रहात होत्या. रेहान काझी याने फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी तो व त्याचे घरचे फिर्यादी यांनी माहेरहून २ लाख रुपये आणावेत, अशी मागणी करुन तिचा छळ करीत होते. तिने माहेरहून पैसे न आणल्याने त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सर्वांनी मिळून फरशी साफ करण्याचे लिक्वीड फिर्यादी यांना जबरदस्तीने पाजून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तिने उपचार घेतल्यानंतर आता कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

get_footer();