आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या पती सतीश रेणूसेसह तिघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 1, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव खुर्द येथील महालक्ष्मी दर्शन अपार्टमेंटमध्ये घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन शारिरीक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. ही घटना आंबेगाव खुर्द येथील महालक्ष्मी दर्शन अपार्टमेंटमध्ये २६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली.

सीमा सतीश रेणूसे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सीमा हिचा भाऊ जय बाजीराव मळेकर (वय १९, रा. केडगाव, जि. अहमदनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सतीश माखाजी रेणूसे (वय ३४, रा. महालक्ष्मी दर्शन, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द), दीर संतोष माखाजी रेणूसे (वय ४०), नणंद शितल चंद्रकांत इंगूळकर (वय ४५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, सीमा रेणूसे हिला कौटुंबिक कारणावरुन शारिरीक व मानसिक त्रास देऊन तिला घालून पाडून बोलण्यात येत होते. तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन सतीश रेणूसे हा सीमा हिच्याशी वारंवार भांडणे करुन मारहाण करीत असे. सासरी होणार्‍या या छळाला कंटाळून सीमा हिने महालक्ष्मी दर्शन अपार्टमेंट येथील घरात २६ फेब्रुवारी रोजी दुपारी आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर तपास करीत आहेत.