आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खुनाच्या गुन्ह्यातील चार महिने हुलकावण्या देणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 3, 2022
Spread the love

रांजणगाव-एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : वाघोलीतील वाघेश्वर मंदिराच्या कमानीजवळ केली अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावण्या देणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. वाघेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सापळा रचून आरोपीला अटक केली.

आर्यन पवार (वय १९, रा. बुरुंज आळी, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे), प्रशांत ऊर्फ नानेश काळुराम ऊर्फ काळ्या काळे (वय २०, रा. चव्हाणवाडी, करडे, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

वाघोली पोलीस चौकी हद्दीमध्ये पोलीस गस्तीवर होते, त्यावेळी ऑक्टोबर २०२१ मध्ये आनंदा योगिराज काळे याचा खून झाला. त्यातील आरोपी वाघेश्वर मंदिराच्या कमानीजवळ थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले. आरोपीला पुढील कारवाईसाठी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

अपर पोलीस आयुक्त चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) तटकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, निखील पवार, पोलीस उपनिरीक्षक सूरज किरण गोरे, सहायक पोलीस फौजदार मोहन वाळके, पोलीस अंमलदार सकटे, कैलास साळुंके, अजित फरांदे, रितेश काळे, समीर पिलाणे, बाळासाहेब तनपुरे, सागर शेडगे, सुधीर अहिवले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();