आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शहरात कोम्बिंग ऑपरेशन, 2924 सराईतांची केली तपासणी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 3, 2022
Spread the love

पोलीस आयुक्तांचे आदेश : पुणे पोलिसांनी राबविली जबरदस्त मोहीम

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणीचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 2924 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 614 गुन्हेगार मिळून आले आहेत.

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्यावतीने कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करुन कारवाई केली. हे कोम्बिंग ऑपरेशन सोमवारी (दि.28 फेब्रुवारी) रात्री 11 ते मंगळवारी (दि.1 मार्च) मध्यरात्री एक या कालावधीत राबवण्यात आले.

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 5 हजार 200 रुपयांचे 15 कोयते, दोन हजार रुपयांच्या 2 तलवारी जप्त करुन 11 आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेने 6 आणि पोलीस स्टेशनने 4 असे एकूण 10 केसेस दाखल केले आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथक-२च्या पोलिसांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 82 हजार रुपये किमतीचा 4 किलो 78 ग्रॅम गांजा जप्त करुन एका आरोपीला अटक केली. त्याच्यावर एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई प्रोहिबिशन ॲक्टनुसार पोलिस स्टेशनने 4 गुन्हे दाखल करुन तीन आरोपींना अटक करुन 1200 रुपयांची 30 लिटर गावठी दारु जप्त केली.

कोम्बींग ऑपरेशनमध्ये सीआरपीसी कायद्यानुसार ४१ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसचे तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आले. तसेच 130 हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी कारवाईमध्ये 554 संशयित वाहन चालकांना चेक करुन 14 जणांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेने 19 दुचाकी, 15 तीन चाकी, 15 चारचाकी अशा एकूण 49 जणांवर कारवाई केली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ सागर पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ पौर्णिमा गायकवाड, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त वाहतुक विभाग राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले.