आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 6, 2022
Spread the love

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : जनता वसाहतीतील घरात जाऊन केला लज्जास्पद प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तू मला खूप आवडते, असे म्हणून घरात शिरुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला मारहाण करुन भिंतीवर ढकलून देऊन बेशुद्ध करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी जनता वसाहतीत राहणार्‍या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जनता वसाहतीत राहणार्‍या एका १६ वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी ही मुलगी जनता वसाहतीत राहते. त्यांच्याच वसाहतीत राहणारा मुलगा तिला वारंवार वाटेत अडवतो. तिचा पाठलाग करतो. गुरुवारी दुपारी ही मुलगी निलायम पुलाजवळून जात होती. तेव्हा या तरुणाने तिला अडविले. तो फिर्यादीला तू मला खूप आवडते, माझ्याशी नीट का बोलत नाही, असे म्हणून शिवीगाळ करुन फिर्यादीला हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर ही मुलगी आपल्या आजीच्या राहते घरात गेली. तिच्या मागोमाग हा तरुण आला. त्याने आजीला ढकलून देऊन घरात शिरला. फिर्यादीशी चाळे करुन तिला जबरदस्तीने जवळ ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तिला पुन्हा हाताने व लाथाबुक्यांने मारहाण करुन भिंतीवर ढकलून दिले. त्यामुळे ही मुलगी बेशुद्ध पडली. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर तिने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.